नांदेड:- शहरातील विमानतळ पोलिस ठाणे हद्दीतील आनंदनगर परिसरामध्ये मानवी तस्करी व तत्सम कलमांमुळे राज मॉल आनंदनगर येथे स्पावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांमध्ये काहीही संबंध नसताना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्यात आले असून विमानतळ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडुन मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राज मॉल येथे झालेल्या वरील कार्यवाही बाबत पवितसिंघ नरेंद्र सिंघ आरत्या यांनी पोलीस अधीक्षक व संबंधितांना निवेदन देऊन आरोप केला आहे की पोलीस स्टेशन विमानतळ चे निरीक्षक रामदास शेंडगे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी त्यांनागुन्हा क्रमांक 368/2026 विमानतळ कलम 4, 5, 6,7 व टाकले आहे.
सदर गुन्ह्यांमध्ये सदरगुन्ह्यामध्ये पवितसिंघ नरेंद्रसिंघ आरतिया यांनी पोलीस उप महानिरीक्षक उमाप यांना दिलेल्या निवेदनात विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामदास शेंडगे व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अतुल भोसले हे विविध नंबरवर वारंवार फोन करून त्यांच्याकडे पैशाची मागणी करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करुन वैयक्तिक व कुटुंबीयांची होत असलेली बदनामी थांबवून न्याय द्यावा अशी मागणी पवितसिंघ आरतिया यांनी केली आह.
सदर गुन्ह्यामध्ये पवितसिंघ नरेदरसिंघ आरतिया यांना आनंदनगर राज मॉल स्पा सेंटर विनाकारण नाव गोवल्यामुळे झालेल्या बदनामीस कारणीभूत असलेले रामदास शेंडगे स्थानिक पोलीस शाखेचे निरीक्षक अतुल भोसले व त्यांचे सहकारी इम्रान यांचेवर कायदेशीर कारवाई करून अभय देण्यात यावे अन्यथा या विरोधामध्ये न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.









