• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.०७(प्रतिनिधी)
तालुका व शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना हा गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष असून, शहादा तालुक्यात पक्षाचे संघटन जोमाने वाढत आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शिवसेना नेते तथा आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.

RelatedPosts

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!


शहादा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी आमदार शिरीषदादा चौधरी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैय्या रघुवंशी यांच्या कार्याने प्रभावित होऊन नांदिया, तलावडी, दुधखेडा, कुसुमवाडा व शहादा येथील विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. रामभैय्या रघुवंशी, शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल, शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे, महिला सेनेच्या जिल्हाप्रमुख सौ. ज्योतीताई राजपूत, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत, ज्येष्ठ नेते जहीर शेख, सुपडू खेडकर, शेतकरी सेनेचे नगिनभाई पाटील, सचिन पाटील, काशिनाथ पाटील, डॉ.राजेंद्र पेंढारकर, सौ. संगीता पवार, नंदाताई सोनवणे, भावना लोहार, गायत्री भामरे आदी उपस्थित होते.तालुक्यातील सुजित शेवाळे, कैलाश पवार, श्रवण सुळे, दिलीप पवार, प्रवीण शिंपी, धरमसिंग पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख अॅड. रामभैय्या रघुवंशी यांच्या हस्ते नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात शिवसेना पक्षाचा गमछा टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले.


यावेळी बोलताना आमदार रघुवंशी यांनी सांगितले की, शिवसेना हा सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणारा पक्ष आहे. शहादा तालुका व शहरातील पदाधिकारी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून, जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करीत आहेत. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळत असून आगामी काळात संघटन अधिक मजबूत होईल.हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैय्या रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे व जयसिंग ठाकरे यांच्या सहकार्याने यशस्वी झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हितेंद्र वर्मा, गोपाल कोळी, हेमंत सूर्यवंशी, जगदीश पाटील, महेश पाटील, एकनाथ ठाकरे, लक्ष्मण पवार, मुरलीधर वळवी, कौतुभ मोरे, अॅड. लव लोहार, धनराज जायसवाल, दीपक मोरे, राकेश पाटील, सागर चौधरी, योगेश कोठारी, मनोज बेदमुथा आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. भोजेंद्र शिंदे यांनी केले. यावेळी युवा सेनेचे राजरत्न बिरारे, जगदीश पवार, प्रवीण सैंदाणे, गुलाब सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार राजेश माणिकराव ढोके यांना जाहीर; श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या वतीने गौरव

Next Post

नांदेड आनंदनगर स्पा प्रकरण; पोलीसांकडुन पैशांची मागणी होत असल्याचा आरोप

Related Posts

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत
Blog

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

October 31, 2026
18
शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट
Blog

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
14
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
13
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
Blog

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

October 29, 2026
9
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन
Blog

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

October 29, 2026
25
Next Post
नांदेड आनंदनगर स्पा प्रकरण; पोलीसांकडुन पैशांची मागणी होत असल्याचा आरोप

नांदेड आनंदनगर स्पा प्रकरण; पोलीसांकडुन पैशांची मागणी होत असल्याचा आरोप

ताज्या बातम्या

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

November 1, 2026
सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’

सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In