• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लेकीच्या शिक्षणासाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला,

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
लेकीच्या शिक्षणासाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला,
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडूनही ५० हजारांचा धनादेश सुपूर्द; मदतीचा ओघही वाढला,

RelatedPosts

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

बीड- अंगावर साधी साडी, पायात तुटकी स्लीपर आणि डोळ्यांत मुलीच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने… अशा बिकट परिस्थितीत ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी बीडमधील धावण्याची स्पर्धा जिंकून नवा इतिहास रचला.

तरण्याबांड धावपटूंना मागे टाकत रमाबाईंनी आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी जिद्दीने प्रथम क्रमांक पटकावला. एका आईच्या या अथांग संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्वतः ही स्टोरी शेअर केल्यानंतर रमाबाई रातोरात प्रकाशझोतात आल्या. रमाबाईंचा हा प्रेरणादायी लढा समोर येताच संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि मदतीचा वर्षाव सुरू झाला. थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने त्यांच्या पायाच्या बुटाची साईज विचारून त्यांना दर्जेदार रनिंग शूज पाठवण्याचा निर्णय घेतला. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ भेट घेत रमाबाईंना ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. आधी बँक खातेही नसलेल्या रमाबाईंचे तातडीने खाते उघडण्यात आले आणि अवघ्या आठवडाभरात देशभरातील दानशूर नागरिकांनी त्यांच्या खात्यात दीड लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा केली.

रमाबाई या इतरांच्या घरी धुणीभांडी आणि घरकाम करून महिन्याला अवघे ९ हजार रुपये कमावत होत्या. त्या तुटपुंज्या उत्पन्नात दोन मुलींचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा हाकणे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरत होते. मात्र, परिस्थितीसमोर हात न टेकता त्यांनी थेट मॅरेथॉनच्या मैदानात उडी घेतली. एका गरीब आईच्या या अफाट धैर्याचे आता संपूर्ण महाराष्ट्रातून आणि विविध सामाजिक संस्थांकडून कौतुक केले जात आहे. आपल्या भावना व्यक्त करताना रमाबाई म्हणाल्या, “माझी धाकटी मुलगी आरती अभ्यासात खूप हुशार आहे. ती गेल्या दोन आठवड्यांपासून एमपीएससीच्या पुस्तकांसाठी हट्ट करत होती. पुस्तकांचे ३२०० रुपये जमवता न आल्याने ती आठ दिवस माझ्याशी बोलली नाही. मी पूर्णपणे हताश झाले होते. रविवारी ३ किलोमीटर धावण्याची स्पर्धा असून ३००० रुपयांचे बक्षीस आहे, हे कळताच मी नाव नोंदवले. फक्त पोरीची पुस्तके आणायची या एकाच विचाराने मी जिवाच्या आकांताने धावले.

Tags: Shambhonath Ranshetre
Previous Post

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, या रस्त्याची दूर अवस्था. मारेगाव ते गोंड बुरांडा रस्ता विस्कळी

Next Post

बोडखा तांड्यात बंजारा समाजाचा ऐतिहासिक तिजोत्सव उत्साहात

Related Posts

Blog

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026
1
Blog

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
1
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!
Blog

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026
0
चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात
Blog

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
0
चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा
Blog

चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

September 7, 2026
4
Blog

मुलींना मोफत शिक्षण’ फक्त घोषणेतच ? महाविद्यालयातील शुल्कप्रश्नी पालक संतप्त !.

September 7, 2026
3
Next Post
बोडखा तांड्यात बंजारा समाजाचा ऐतिहासिक तिजोत्सव उत्साहात

बोडखा तांड्यात बंजारा समाजाचा ऐतिहासिक तिजोत्सव उत्साहात

ताज्या बातम्या

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In