पाचोरा:
जळगाव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका स्तरीय ‘स्पेलिंग बी’ (Spelling Bee) स्पर्धा नुकताच निर्मल इंटरनॅशनल प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली . पाचोरा तालुक्यातील १४ केंद्रांमधील यशस्वी विद्यार्थ्यांनी या तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती स्वाती हवेले मॅडम (उपशिक्षणाधिकारी, जळगाव), श्रीमती सानप मॅडम (शिक्षण विस्तार अधिकारी, जळगाव) आणि श्रीमती सरोज गायकवाड मॅडम (शालेय पोषण आहार अधीक्षक, पाचोरा) उपस्थित होत्या.
चार गटांत रंगली स्पर्धा; विजेत्यांना जिल्हास्तराचे तिकीट!
ही स्पर्धा एकूण चार गटांत पार पडली. प्रत्येक गटातून दोन उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या 8 विजेत्या विद्यार्थ्यांना आता जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत पाचोरा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
“सचिन तेंडुलकरही शून्य वर बाद होतो!” — गटशिक्षणाधिकारी विजय पवार
गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. या वेळी स्पर्धेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवताना ते म्हणाले, “अपयशाने निराश होण्याचे अजिबात कारण नाही. कधीकधी महान फलंदाज सचिन तेंडुलकरही शून्य धावांवर बाद होतो! पराभवातून शिकून पुढे जाणे हाच खरा खेळ आहे.” तसेच, त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आतापासूनच कसून तयारी करण्याचे आवाहन केले.
परिश्रम आणि संयोजन
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट समन्वयक जितेंद्र पाटील, अनिल पाटील, शांताराम वानखेडे, सखाराम महाजन,चंद्रकांत मोराणकर, ज्ञानेश्वर पाचोळे, अनिल वराडे,रामदास जाधव, विशाल पवार, रामराव पाटील, संदीप पवार, राजेश सोनवणे, अनिल वराडे, शेख जावेद रहीम, प्रज्ञा त्रिगुणे, घनशाम चौधरी, सुवर्णा पाटील आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद धनगर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. शेख जावेद रहीम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले
स्पेलिंग बी विजेते जि प विद्यार्थी आणि शाळा
गट पहिला.
- स्वादीप दीपक जाधव , भोजे
- ऋत्विक शरद पाटील, बांबरुड राणी.
गट दुसरा
- दिशा गणेश पाटील, नांद्रा
- तयबा सलाम खाटीक, पाचोरा उर्दू.
- गट तिसरा
- प्रीती पांडुरंग देशमुख कुऱ्हाड खुर्द.
- अतिका फारूक काकर, लोहारी बुद्रुक.
गट चौथा - प्राची अतुल ठाकरे ,कुरंगी
- ज़क्वान शकील खान, पिंपळगाव उर्दू..










