• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 23, 2026
in Blog
0
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगात शून्य उत्पादनाचा पंचनामा; शेतकऱ्यांच्या अडचणींची घेतली माहिती

धारासूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयशिंह चव्हाण यांनी बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील विविध गावांतील शेतीची पाहणी केली. यावेळी महातपुरी येथील गट क्रमांक २९५ मध्ये शेतकरी राम केरबा मुलगीर यांच्या शेतावर मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगात शून्य उत्पादनाची नोंद होऊन पंचनामा करण्यात आला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी महातपुरी, माखणी, शिरसम आणि जवळा परिसरातील विविध शेतांना भेटी देऊन पिकांची सद्यस्थिती, पावसाचा परिणाम आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान विविध ठिकाणी पीक कापणी प्रयोगही घेण्यात आले.

RelatedPosts

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

महातपुरी येथील पीक कापणी प्रयोगात उत्पादन न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या शेताचा शून्य उत्पादनाचा पंचनामा करण्यात आला. या प्रक्रियेमुळे परिसरातील पिकांच्या प्रत्यक्ष स्थितीची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांचे नुकसान आणि शेतीसमोरील अडचणींची माहिती घेतली. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा आढावा महत्त्वाचा मानला जात आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डाकघर, गंगाखेडचे तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाहणीच्या वेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गौंडगावात एनसीडी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर

Next Post

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

Related Posts

Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
2
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
0
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Blog

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
3
Next Post
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

ताज्या बातम्या

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In