• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 23, 2026
in Blog
0
शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

धुळे, दि. १८ सप्टेंबर २०२६ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे १६ व १७ सप्टेंबर रोजी ‘शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन’ या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

प्रशिक्षणाचे उद्घाटन शासकीय कृषी महाविद्यालय, धुळेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल देसले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील व डॉ. धनराज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

प्रास्ताविकात डॉ. दिनेश नांद्रे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट करताना शेतकऱ्यांनी शेळीपालन व्यवसायाकडे शास्त्रीय व व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. प्रशिक्षणातून मिळणाऱ्या तांत्रिक ज्ञानाचा प्रत्यक्ष शेळीपालन व्यवसायात उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. राहुल देसले यांनी शेळीपालन हा ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसाठी उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण पूरक व्यवसाय ठरू शकतो, असे सांगितले. शास्त्रीय व्यवस्थापन, योग्य पोषण, आरोग्य काळजी आणि बाजारपेठेचे नियोजन यावर भर देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थींना केले.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी यांनी शास्त्रीय पद्धतीने शेळीपालन, संतुलित आहार व पोषण, गोठा स्वच्छता व व्यवस्थापन, रोग प्रतिबंध आणि आरोग्य व्यवस्थापन या विषयांवर सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी डॉ. धनराज चौधरी व पशुसंवर्धन विभाग, धुळे येथील पशुविकास अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी शास्त्रीय शेळीपालन, संतुलित आहार, करडांचे संगोपन, रोग प्रतिबंध व आरोग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात शेळी व बोकड विक्री, विपणन व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे नियोजन याबाबत डॉ. धनराज चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रशिक्षणार्थींना कृषी विज्ञान केंद्रातील शेळीपालन प्रात्यक्षिक प्रकल्पास भेट देण्यात आली. यावेळी प्रकल्पाची रचना, व्यवस्थापन पद्धती आणि विविध प्रात्यक्षिक उपक्रमांची माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणाचा समारोप पशुसंवर्धन विभाग, धुळेचे उपायुक्त डॉ. गिरीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील, शासकीय कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अविनाश महाले आणि शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्णत्वाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. धनराज चौधरी यांनी केले, तर आभार डॉ. पंकज पाटील यांनी मानले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous Post

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

Next Post

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
0
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
2
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In