श्रीगोंदा (प्रतिनिधी) : मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथील उंडेमळा जिल्हा परिषद शाळेत आयोजित माता पालक विशेष बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीसह विविध समित्यांची निवड करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश गंगाधर शिंदे, तर उपाध्यक्षपदी रोहिणी प्रदीप वाबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सखी सावित्री मंचच्या अध्यक्षपदी श्रद्धा मोहन गायकवाड, उपाध्यक्षपदी अर्चना सोमनाथ खराडे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी तृप्ती भरत शिंदे, उपाध्यक्षपदी टाकेश्वरी दिलीप नेताम यांची निवड झाली. विद्यार्थी सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी सागर शिवाजी गागरे, उपाध्यक्षपदी चंदर भीमा पालवे, तर शालेय भौतिक सुविधा विकास समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ गोपाळ शिंदे आणि उपाध्यक्षपदी ऋषिकेश सुभाष वाबळे यांची निवड करण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या विविध सदस्यपदांसाठी शिक्षणतज्ज्ञ म्हणून डॉ. प्रदीप जगदेव उंडे, स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून सोनाली नवनाथ उंडे, सामाजिक क्षेत्रातून भाऊसाहेब शिंदे, थोर देणगीदार म्हणून माणिकराव मांडे, वंचित व दुर्बल घटक सदस्य म्हणून भारती सतीश शिंदे व राहुल जंबू गिरे, अनुसूचित जमाती सदस्य म्हणून विनोद भिल यांची निवड झाली. महिला प्रतिनिधी म्हणून सारिका वाघमारे, नयनतारा शिंदे, सुवर्णा शिंदे, शुभांगी पवार व सुमन कुंजाम यांची निवड करण्यात आली.
शालेय व्यवस्थापन समित्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सुधारणा, शाळेतील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकसहभाग









