गणरायाची आरती करून मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार; महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाच्या चरणी साकडे
प्रतिनिधी
शिरूर : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!’च्या जयघोषाने शिरूर शहरातील विविध गणेश मंडळांचा परिसर भक्तिमय झाला. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना सदिच्छा भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी, भरभराटीसह सर्वांच्या कल्याणासाठी गणरायाच्या चरणी साकडे घालण्यात आले.
आमदार माऊलीआबा कटके यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणेशभक्तांशी संवाद साधला तसेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. विविध मंडळांमध्ये त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कारही करण्यात आला. शहरातील विविध भागांत गणेशोत्सवानिमित्त सुरू असलेल्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली.
गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उत्सवाच्या आयोजनाबाबतही आमदार कटके यांनी माहिती घेतली. यावेळी गणेशभक्तांचा उत्साह आणि विविध मंडळांकडून करण्यात आलेली उत्सवाची तयारी पाहायला मिळाली.
याप्रसंगी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, बांधकाम सभापती सुनीलदादा जाधव, स्वच्छता सभापती एजाजभाई बागवान, नगरसेवक अभिजीतकाका पाचर्णे, निलेशदादा गाडेकर, तुषारदादा मांडगे, नगरसेविका संगीताताई मल्लाव, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती आयेशा सय्यद, सभापती स्वाती साठे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरभाई पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शरदनाना कालेवार, आदर्श माजी सरपंच विठ्ठल घावटे, संतोष शितोळे, जयवंत साळुंके, राजेंद्र कटके, युवा नेते स्वप्निल रेड्डी, महेंद्र येवले, सिद्धांत चव्हाण, योगेश कदम, यश धनी, सुमित रेड्डी, कलिम सय्यद, सागर सातारकर, चेतन साठे, हर्षल ओस्तवाल, मयूर ओस्तवाल, ओम जाधव, हर्षद शेख, शाहरूख अत्तर, रंजन झांबरे, अविनाश घोगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










