• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

मूळ हल्ला प्रकरणातील आरोपीच्या पत्नीविरुद्धही सहभागाचा दावा; माहूर पोलिसांकडे चौकशी व संरक्षणाची मागणी

माहूर : प्रतिनिधी

RelatedPosts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शेकापूर येथील ग्रामसभा प्रकरणात दाखल असलेला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून, स्वतःसह कुटुंबीय व प्रकरणातील साक्षीदारांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पत्रकार समाधान अशोक कांबळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी माहूर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कांबळे यांनी अर्जात नमूद केल्यानुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी शेकापूर येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील विविध विकासकामांसाठी प्राप्त निधी, करण्यात आलेली कामे तसेच जमाखर्चाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी सुनील नामदेवराव बेहेरे, रामेश्वर रेणुकादास चव्हाण, गणेश नामदेव राठोड व विवेक गणेश राठोड यांनी वाद घालून मारहाण केल्याने डोक्याला दुखापत झाली. तसेच धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ व सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

या घटनेप्रकरणी कांबळे यांच्या फिर्यादीनुसार संबंधित व्यक्तींविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.

प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी गणेश नामदेव राठोड यांची पत्नी सिंधू गणेश राठोड तसेच नामदेव पुनाजी राठोड हे गुन्हा मागे घेण्यासाठी स्वतःसह कुटुंबीय आणि साक्षीदारांवर दबाव आणत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. सिंधू गणेश राठोड यांचा मूळ हल्ल्याच्या घटनेतही सहभाग असल्याचा दावा आपण यापूर्वी पोलिसांकडे केला असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.

दुकानाला आग लागल्याच्या घटनेचा गैरफायदा घेतल्याचा दावा

२० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सिंधू गणेश राठोड यांच्या किराणा दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा आधार घेत पत्रकार कांबळे, त्यांच्या कुटुंबीय तसेच प्रकरणातील साक्षीदारांविरुद्ध दुकान जाळल्याची खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अर्जातून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मूळ प्रकरण मागे घेण्यासाठी मानसिक दबाव निर्माण केला जात असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.

संरक्षण देण्याची पोलिसांकडे मागणी

आपल्यासह कुटुंबीय, प्रकरणातील साक्षीदार आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध खोट्या कारवाया होण्याची शक्यता असून, आपल्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती कांबळे यांनी अर्जात व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सिंधू गणेश राठोड व नामदेव पुनाजी राठोड यांच्या भूमिकेची पडताळणी करावी, खोट्या तक्रारींच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्यास कायदेशीर कारवाई करावी तसेच स्वतःसह कुटुंबीय व साक्षीदारांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणी पत्रकार समाधान कांबळे यांनी माहूर पोलिसांकडे केली आहे. या आरोपांबाबत पोलिसांकडून अधिकृत चौकशी अथवा कारवाईची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

Next Post

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

Related Posts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
0
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
7
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
41
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
23
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
111
Next Post
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In