५३ महाराष्ट्र बटालियनच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी; विविध शारीरिक व वैद्यकीय चाचण्यांनंतर कॅडेट्सची निवड
नळदुर्ग : प्रतिनिधी
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पुनर्निवड चाचणी प्रक्रिया पार पडली. तसेच एनसीसी विभागाची पाहणी करण्यासाठी ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरचे सुभेदार मेजर कमल सिंग, सुभेदार संतोष पाटील आणि बी.एच.एम. सुनील काळे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, डॉ. ए. टी. कदम आणि डॉ. यू. एन. भाले यांच्या हस्ते उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. सुभेदार मेजर कमल सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी अध्यक्षीय समारोप केला. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. एच. एम. मिर्झा यांनी केले.
निवड चाचणी प्रक्रियेत विद्यार्थ्यांची उंची, वजन, धावणे, पुल-अप, पुश-अप तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात आली. विविध चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची एनसीसी कॅडेट म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या कॅडेट्सचे सुभेदार मेजर कमल सिंग यांनी अभिनंदन केले.
या संपूर्ण निवड चाचणी प्रक्रियेचे नियोजन एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. अतिश तिडके यांनी केले. एनसीसी विभागाच्या पाहणीसह झालेल्या या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेच्या भावनेशी जोडण्याची संधी मिळाली.










