मलकागुडा येथे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वाणाच्या वैशिष्ट्यांसह लागवड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
माहूर, दि. २२ सप्टेंबर २०२६ : रासी सिड्स प्रा. लि. यांच्या वतीने मलकागुडा, ता. माहूर, जि. नांदेड येथे रासी अमेझे (RCH 999) या कापूस वाणाची पीक पाहणी आयोजित करण्यात आली. बदलते हवामान आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कापूस बियाणे क्षेत्रात विविध वाण विकसित करण्याच्या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.
मलकागुडा येथील शेतकरी राजू अमरसिंग राठोड यांच्या शेतात झालेल्या या पीक पाहणी कार्यक्रमास पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहून रासी अमेझे (RCH 999) या वाणाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी रासी सिड्सचे विभागीय विक्री व्यवस्थापक रमेश शिरसाठ आणि नांदेड जिल्हा प्रमुख समीर चवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रासी अमेझे (RCH 999) या वाणाची वैशिष्ट्ये, लागवड व्यवस्थापन तसेच पिकाच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतातील पिकाची पाहणी करून वाणासंदर्भातील विविध माहिती जाणून घेतली. पीक पाहणीदरम्यान शेतकऱ्यांमध्ये या कापूस वाणाबाबत उत्सुकता दिसून आली.









