करमाळा : प्रतिनिधी
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माजी आमदार संजय (मामा) शिंदे गटाच्या सौ. शारदा आप्पासाहेब सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन उपसरपंच शारदा सरडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच विशाल विश्वनाथ सरडे, ग्रामसेवक गणेश पवळ, ग्रामपंचायत सदस्य बायडाबाई निकत, प्रविण उत्तम सरडे, कोमल विकास भोसले, दिपाली नागेश पवार यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन उपसरपंच शारदा सरडे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








