मेहकर/प्रतिनिधी
शेतकरी बांधवांच्या हक्काच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची आज प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आमदार सिद्धार्थ खरात यांनी पाहणी केली. तसेच, या टर्फमधून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य आहे का, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून कामाचा सद्यस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी कामाचा दर्जा, तांत्रिक बाबी आणि कामाची गती याबाबत सविस्तर माहिती त्यांनी पूर्ण जाणून घेतली. हे काम पूर्ण झाल्यास परिसरातील हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे काम दर्जेदार पद्धतीने आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर मोसंबेवाडी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात जानेफळ परिसरातील शेकडो शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सिंचनाच्या प्रश्नांबाबत त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील!
या पाहणी दौऱ्याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आशिषभाऊ रहाटे, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, डॉ. शेषराव बदर, संजय सुळकर, तात्या कृपाळ, डॉ. नंदकिशोर देशमुख, साहेबराव पाटील हिवाळे, उत्तमराव राजगुरू, राजू गायकवाड, गणेश देवकर, नंदकिशोर राजेकर, बाळूभाऊ पाखरे यांच्यासह पेणटाकळी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती डावरे, उपअभियंता. घुले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.










