• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगातील कथित मतभेदांचा मुद्दा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

ब्रह्मपुरी | ता. प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर

RelatedPosts

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ब्रह्मपुरी येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) तसेच अन्य निर्णयांबाबत १० महिन्यांच्या कालावधीत किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचा वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या आंदोलकांनी या प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून केली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना SIRसह आयोगाचे सर्व महत्त्वाचे निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने आणि एकमताने घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेसच्या आरोपांसोबत आयोगाची भूमिका देखील चर्चेत आहे.

काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. थानेश्वर कायरकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगराध्यक्ष योगेश मिसार, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी जिल्हा सदस्य प्रमोद चिमूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. राजेश कांबळे, वासुदेव सौंदरकर, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, बंटीभाऊ श्रीवास्तव, नेताजी मेश्राम, वामन मिसार, नगरसेवक राकेश पडोळे, विनोद बुल्ले, कपिल राऊत, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मंगला लोनबले, माजी जिल्हा परिषद सदस्या भावना इरपाते, नगरसेविका रंजना बुराडे, बबीता आमले, लताताई ठाकूर, सुनीताताई तिडके, रश्मी पगाडे, जया कन्नाके, सुशीला सोंडवले, अरुण अलोने, जगदीश आमले, कल्पना तुपट, राममोहन ब्राडिया, इरफान पठाण, गीता मुंगले, किशोर राऊत, रुपेश बानबले, मोहसिन कुरेशी, केशव करंबे, मुकुंदा राऊत, संजय राऊत, ज्ञानेश्वर झरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Thaneshwar Kaykar
Previous Post

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

Next Post

दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
0
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
2
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
2
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
5
येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली
ताज्या घडामोडी

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

September 30, 2026
8
ताज्या घडामोडी

ठाणगाव, पाटोदा आणि कानडी शिवारातील गणपती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

September 30, 2026
14
Next Post
दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

September 30, 2026

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In