• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 30, 2026
in Blog
0
दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

बुद्ध, धम्म आणि संघाच्या विचारांचा प्रसार; प्रज्ञा, करुणा, मैत्री व समतेचा संदेश

दिघोडे | प्रतिनिधी

RelatedPosts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

अखिल उरण तालुका बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १, पंचशील मंडळ आणि रमाई महिला मंडळ, दिघोडे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, दिघोडे, ता. उरण येथे रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध पूजापाठाने झाली. बौद्धाचार्य धम्मरत्न आयु. हिरामण जोशी गुरुजी आणि बौद्धाचार्य आयु. प्रमोद कांबळे यांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा पूजापाठ केला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल उरण तालुका बौद्धजन पंचायत समिती ग्रामीण शाखा क्र. १ चे अध्यक्ष आयु. सुदर्शन जाधव यांनी भूषविले. यावेळी पंचशील मंडळाचे अध्यक्ष आयु. कृष्णा जोशी, काशिनाथ जोशी, बौद्धजन पंचायत समितीचे उपाध्यक्ष संजय गायकवाड, ज्येष्ठ सभासद रमेश गायकवाड, सदानंद गायकवाड, सुरेश गायकवाड, अनिल गायकवाड, दीपक गायकवाड, सरचिटणीस सुनील जोशी, नवनीत कांबळे, धम्मप्रचारक विजया जोशी, संकेता जोशी, दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, बौद्धजन पंचायत समितीचे खजिनदार अशोक कांबळे गुरुजी, चिरनेरचे कार्यकारी सभासद प्रमोद गाडे यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

‘वर्षावासाचे महत्त्व’ विषयावर मार्गदर्शन

पनवेल तालुका अध्यक्ष (भारतीय बौद्ध महासभा) तथा उद्योजक ॲड. सुनील वाघपंजे यांनी प्रमुख प्रवचनकार म्हणून मार्गदर्शन केले. ‘बौद्ध धम्मामध्ये वर्षावासाचे महत्त्व’ या विषयावर बोलताना त्यांनी भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेली वर्षावासाची परंपरा, त्यामागील धम्मविचार तसेच वर्षावासाच्या काळातील धम्म-अभ्यास, चिंतन, आत्मपरीक्षण आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व स्पष्ट केले.

वर्षावासाच्या माध्यमातून बुद्ध, धम्म आणि संघाच्या विचारांचा समाजात प्रसार करून प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि समतेची मूल्ये रुजविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. प्रफुल्ल मनोहर जोशी आणि आयु. संदीप गजानन जोशी यांनी केले. विंधणे, चिरनेर, कळंबूसरे, पिरकोन, दिघोडे तसेच उरण परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, बालक-बालिका, बौद्ध उपासक-उपासिका आणि धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर गोडधोड भोजन समारंभ पार पडला. उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पंचशील मंडळ, महिला मंडळ आणि युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

Next Post

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

Related Posts

Blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

September 30, 2026
1
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन
Blog

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

September 30, 2026
3
मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा
Blog

मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

September 30, 2026
5
मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट
Blog

मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट

September 30, 2026
7
माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
7
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
10
Next Post
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

September 30, 2026

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In