• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जोशीवस्ती आठवडे बाजारात मनमानी वसुलीचा आरोप; ग्रामपंचायतीच्या नोटिसांनाही केराची टोपली?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

राहुल छत्तीसे यांचा चौकशी व कारवाईची मागणी

श्रीगोंदा : प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील जोशीवस्ती ग्रामपंचायतीच्या आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा बाजारकर वसूल केला जात असल्याचा आरोप राहुल संजय छत्तीसे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी व अर्ज साद करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

RelatedPosts

येवल्यात पोलिसांची मोठी कारवाई; ५,०६५ जिलेटिन कांड्या व १,५९५ डिटोनेटर जप्त

श्रीगोंद्यात पाणीटंचाई आढावा बैठक; उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

राहुल छत्तीसे यांनी २९ जुलै, १८ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज दिल्याचे सांगितले. तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने बाजारकर लिलावधारकाला ३१ जुलै रोजी नोटीस बजावली. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी दुसरी तसेच अंतिम नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामपंचायतीच्या नोटिशीनुसार, लिलावाच्या अटी व शर्तीनुसार १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून दिलेला नसल्याची तसेच ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बाजारकराची वसुली न करता जादा दराने वसुली होत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित लिलावधारकाला यापूर्वी लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारी सुरूच राहिल्याने यापुढे बाजारकराची वसुली अटी व शर्तीनुसारच करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ग्रामपंचायतीकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा बाजारकराचा लिलाव रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून काही त्रुटी आढळून आल्याची माहिती पुराव्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा दावा राहुल छत्तीसे यांनी केला आहे. लिलावधारकाने ग्रामपंचायतीच्या अटी-शर्ती व नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच काही व्यक्तींकडून संबंधित लिलावधारकाला पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही छत्तीसे यांनी केला आहे. बाजारातील व्यापाऱ्यांवर दबाव आणला जात आहे का, याचीही प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व प्रेसनोटची सत्यताही तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जोशीवस्ती आठवडे बाजारातील बाजारकर वसुलीचा प्रश्न चर्चेत आला असून, ग्रामपंचायत व प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Shirang Salwe
Previous Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या क्रॉसकंट्री खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

Related Posts

ताज्या घडामोडी

येवल्यात पोलिसांची मोठी कारवाई; ५,०६५ जिलेटिन कांड्या व १,५९५ डिटोनेटर जप्त

October 2, 2026
27
श्रीगोंद्यात पाणीटंचाई आढावा बैठक; उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्यात पाणीटंचाई आढावा बैठक; उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

October 2, 2026
3
ताज्या घडामोडी

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

October 2, 2026
1
उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक
ताज्या घडामोडी

उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक

October 2, 2026
3
बसच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू
ताज्या घडामोडी

बसच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

October 2, 2026
39
रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात

October 2, 2026
8
Next Post
चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

ताज्या बातम्या

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In