• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in Blog
0
प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; अमरावतीत ‘आस्था-दीप संमेलन २०२६’ उत्साहात संपन्न

अमरावती / प्रतिनिधी : समाजातील अंधार दूर करून शिक्षण, प्रबोधन, संघटन आणि सहकाराच्या माध्यमातून परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘आस्था-दीप संमेलन २०२६’ शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी अमरावती येथील जोशी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

RelatedPosts

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’

खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा

या संमेलनात लोणार सरोवर, जिल्हा बुलढाणा येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत त्यांनी केलेले कार्य, तसेच सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांचा विशेष व्यक्तिमत्त्व म्हणून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता प्रकाश नागपुरकर होते. संमेलनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या तथा सत्यशोधक व्याख्यात्या प्रा. डॉ. नीलिमा मुळे यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शक म्हणून दैनिक तरुण भारत, नागपूरच्या संचालिका तथा महिला समन्वय प्रमुख, विदर्भ प्रांताच्या मीरा कडवे उपस्थित होत्या. मुंबई येथील सचिन परब यांचीही विशेष उपस्थिती होती.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उच्च पदप्राप्त व्यक्ती गौरव पुरस्काराने मुंबई येथील कस्टम विभागाचे आयटी प्रमुख संजय वैद्य यांना सन्मानित करण्यात आले. विशेष शैक्षणिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्कार नांदगाव खंडेश येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा एकलव्य धनुर्विद्या अकॅडमीचे संस्थापक सदानंद जाधव यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने झाली. प्रा. अंकुश मानकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवा पिंपळकर यांनी प्रास्ताविकातून आस्था ग्रुपच्या कार्याचा आणि संमेलन आयोजनामागील उद्देशाचा परिचय करून दिला. आस्था ग्रुपचे संस्थापक गजानन अंजनकर यांनी आभार प्रदर्शन केले. समारोपप्रसंगी माया नांदूरकर यांनी भारतीय संविधानाचे वाचन करून संविधानातील मूल्यांचा जागर केला.

‘चलो जलाऐ दीप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा है’ या प्रेरणादायी विचाराला केंद्रस्थानी ठेवून आयोजित या संमेलनातून शिक्षण, संस्कार, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. आस्था ग्रुप महाराष्ट्राच्या वतीने आयोजित हे संमेलन समाजपरिवर्तनाच्या दिशेने प्रेरणा देणारे ठरले.

Ad 1
Previous Post

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

Related Posts

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
Blog

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026
3
चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’
Blog

चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’

November 16, 2026
7
खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा
Blog

खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा

November 16, 2026
9
आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा
Blog

आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा

November 16, 2026
3
अकोळनेर येथे ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन
Blog

अकोळनेर येथे ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन

November 16, 2026
3
प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न
Blog

प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

November 16, 2026
12

ताज्या बातम्या

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

November 16, 2026
कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

November 16, 2026
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In