सुरेखा मातने हिची नाशिक येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागीय स्पर्धेसाठी निवड
श्रीगोंदा (प्रतिनिधी) : शेवगाव येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची लाँग डिस्टन्स रनर सुरेखा मातने हिने उल्लेखनीय कामगिरी केली. तिची नाशिक येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुरेखा मातने हिने यापूर्वी अनेक हाफ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेतही चांगली कामगिरी केली आहे. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राहुलदादा जगताप, महावीर पटवा, प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, प्रा. श्रीकांत थोरात, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरेखा मातने हिचे अभिनंदन केले.
तिला शारीरिक शिक्षण संचालक प्रा. कल्पना बागुल व क्रीडा शिक्षक संजय डफळ यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या पुढील स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.










