• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

दुष्काळ, पाणीटंचाई, शाळा दुरुस्ती व विविध शासकीय योजनांवर सविस्तर चर्चा

काठी प्रतिनिधी : ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली.

RelatedPosts

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

ग्रामसभेत जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू व विवाह नोंदींना मान्यता देणे, व्ही.बी.जी. रामजी योजना, ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान, कृषी, शिक्षण, आरोग्य, विद्युत व पशुसंवर्धन विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त परिपत्रकांचे वाचन, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न आणि ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवरही चर्चा झाली.

नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी अंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विविध गावांतील पाणीटंचाईचा प्रश्न तसेच जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीबाबतही ग्रामसभेत चर्चा झाली.

मतदार यादीतील नोंदणीसंदर्भातील एसआयआर प्रक्रियेबाबतही माहिती घेण्यात आली. ग्रामसभेत उपस्थित ज्येष्ठ नागरिक व युवकांकडून गावातील विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

सरपंच सोन्या वसावे यांनी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामस्थांनीही लक्ष देणे आवश्यक असून शिक्षकांनीदेखील आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी भांग्रापाणी, पिंप्रापाणी, वेरी चनवाई, जामली, उमटी व पिंपटी आदी गावांतील युवक, ज्येष्ठ नागरिक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सरपंच, उपसरपंच, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भांग्रापाणी येथील डॉ. जालमसिंग पाडवी, पत्रकार ईश्वर तडवी तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: Vasant Pawara
Previous Post

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

Related Posts

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
0
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
1
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
4
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
ताज्या घडामोडी

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

October 3, 2026
1
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
16
ताज्या घडामोडी

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

October 2, 2026
3

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In