• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

गुरुजनांचे आगळेवेगळे स्वागत; शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून आकर्षक नामफलकाची भेट

पेण प्रतिनिधी | दि. ३ ऑक्टोबर २०२६

RelatedPosts

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

क्रांतिकारक कै. गंगाधर मराठे विद्यामंदिर, नगरपरिषद पेण शाळा क्र. १ येथे माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व माजी मावशी यांचे भव्य स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

या वेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे पाय धुऊन, पुसून फुलांच्या पायघडीवरून फुलांचा वर्षाव करत आगळ्या पद्धतीने स्वागत केले. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला नवीन आकर्षक नामफलक भेट देण्यात आला. या फलकाचे अनावरण माजी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आजी-माजी शिक्षक, मावशी व विद्यमान शिक्षकांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. शाळेतील विद्यमान विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देण्यात आल्या.

सत्काराला उत्तर देताना माजी शिक्षक व मावशींनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत, आयुष्यात प्रथमच अशा प्रकारे कौतुक व सन्मान मिळाल्याचे सांगितले. शाळेची सध्याची परिस्थिती पाहून माजी विद्यार्थी व शिक्षकांनीही हळहळ व्यक्त केली. शाळेसाठी आवश्यक वस्तू व इतर मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमास माजी शिक्षक प्रिया शेटे, माऊस्कर, शिंगरुत, नयन जोशी, वृषाली जोशी, क्रांती धामणकर, फडतरे, आंधरे, बंगारे, विजया म्हात्रे तसेच माजी मावशी पिलाने, मेंडोसा व पाठारे उपस्थित होत्या. विद्यमान मुख्याध्यापिका रणपिसे मॅडम, आर्या पाटील, जोस्ना दळवी, जोस्ना गायकवाड मावशी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अनु मधू वाघमरे व उपाध्यक्षा आरती जाधव यांची उपस्थिती होती.

यावेळी सुमारे ५० माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अल्पोपहार व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Previous Post

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

Next Post

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

Related Posts

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
2
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
1
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
5
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
4
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
Next Post
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

ताज्या बातम्या

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In