वाशी तालुका प्रतिनिधी:राजेंद्र अहिरे
वाशी येथून जवळच असलेल्या मौजे पिंपळगाव क.येथील राधा गोवर्धन कोकणे यांचा सर्वे नंबर 34 मधील तोडणी साठी आलेला 2 एकर ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. आत्ता असे झाले आहे दुष्काळाच्या झळा त्यात तेरावा. आधीच वरुण राजाने पाठ फिरविल्याने शेतकरी हतबल झालेला असताना हे संकट.










