पत्रकार कैलासराजे घरत
मुंबई विभाग प्रतिनिधी
रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी दादर पूर्व रेल्वे स्थानक शेजारील येथे संत गाडगेबाबा धर्मशाळा येथे लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन तर्फे संत गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्ट दादर येथील धर्मशाळेतील राहणाऱ्या कैंसर ग्रस्त पीडित रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत ऑक्टोबर सेवा सप्ताह २०२६ प्रित्यर्थ अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी मुंबई नगरपाल डॉ जगन्नाथ हेगडे तसेच, होजेफा घडीयाली, सायरस सुर्ती, समाजसेविका कु. दर्शना जैन, जेष्ठ समाजसेवक शशिकांत सावंत, लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे, राजकवी डॉ.ख.रा.माळवे, शब्दश्री विलास देवळेकर आवर्जून उपस्थित होते. आणि व्यवस्थापक प्रशांत देशमुख तसेच, जेष्ठ व श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते. या वेळी, संगीताचा- भजनाचा तसेच अन्नदानाचा कार्यक्रमात अंदाजे ५०० ते ६०० गरजू लोकांनी सहभाग घेतले.











