२२० घरांतील कोर परिवाराचा उत्स्फूर्त सहभाग; मंदिरात भक्तिमय आणि आनंदमय वातावरण!
असोळे, ता. मुरबाड : असोळे गावातील कोर परिवाराच्या श्री कुलस्वामिनी मंदिरात रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
या घटस्थापना सोहळ्याला कोर परिवारातील सुमारे २२० घरांतील मंडळींनी सहभाग घेतला. देवीच्या आरतीचा लाभ घेत सर्व भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात आनंदमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कोर परिवारातील सर्व मंडळींनी एकत्र येत श्रद्धा, एकजूट आणि परंपरेचे दर्शन घडवले. घटस्थापनेनिमित्त पुढील नऊ दिवस मंदिरात आरती, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोर परिवारातील सर्वांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन कुलस्वामिनी मातेच्या सेवेत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आई कुलस्वामिनी मातेचा उदो उदो! 🙏🌺











