• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

चारही रिले संघांचा प्रथम क्रमांक; वैयक्तिक प्रकारांतही उल्लेखनीय यश, कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
सावर्डे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील शालेय मैदानी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. या स्पर्धेत विद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या ४×१०० मीटर आणि ४×४०० मीटर रिले संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही खेळाडूंनी यश संपादन केले. या कामगिरीमुळे अनेक खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ते रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

वैयक्तिक प्रकारांत चिन्मयी शिगवण हिने ४००, ८०० आणि १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. शौर्य खापरे याने ११० मीटर हर्डल्समध्ये प्रथम, तर विपुल साळवी याने ४०० मीटरमध्ये प्रथम आणि ८०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. इच्छा राजभर हिने ३००० मीटरमध्ये द्वितीय आणि १५०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. भक्ती घडशी हिने १०० मीटर हर्डल्समध्ये तृतीय, पियुष गुरव याने ४०० मीटरमध्ये तृतीय, तर सर्वेश खापरे याने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
सांघिक प्रकारांत मुलींच्या ४×१०० मीटर आणि ४×४०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक मिळवला. या संघात इच्छा राजभर, चिन्मयी शिगवण, मुक्ता भुवड, वंशिका सिंगन आणि भक्ती घडशी यांचा समावेश होता. मुलांच्या दोन्ही रिले संघांनीही प्रथम क्रमांक पटकावला. या संघात विपुल साळवी, सार्थक घडशी, सर्वेश खापरे, शौर्य खापरे आणि पियुष गुरव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, उपाध्यक्ष प्रशांतशेठ निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. आगामी विभागीय स्पर्धेसाठीही खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

Ad 1
Previous Post

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

Next Post

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
5
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
36
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
23
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित
Blog

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

October 11, 2026
10
Next Post
चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In