काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन; नेहरूंच्या कार्याचे केले स्मरण
ब्रह्मपुरी | प्रतिनिधी | दि. १४ नोव्हेंबर २०२६
भारताचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि बालकांचे लाडके ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ब्रह्मपुरी येथील तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, प्रदेश सचिव डॉ. थानेश्वर कायरकर, नगरसेवक पुष्पाकर बांगरे, नगरसेवक वकार खान, जिल्हा काँग्रेस सचिव वासुभाऊ सोंदरकर, जिल्हा काँग्रेस सहसचिव गाजी पटेल, अनुसूचित जमाती विभागाचे कार्याध्यक्ष अमित कन्नाके, शहर काँग्रेस पदाधिकारी सोमेश्वर उपासे, कृउबा संचालक ब्रह्मदेव दिघोरे, राममोहन ब्राडिया, महिला काँग्रेस कार्याध्यक्ष सुधा राऊत आणि सुरेश वंजारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










