• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 14, 2026
in Blog
0
सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे यांच्या परिवाराकडून एक लाख, उपनगराध्यक्ष नितीनदादा पाचर्णे यांच्याकडून ५० हजार, तर महायुतीचे नगरसेवक, नगरसेविका व सभापतींकडून दीड लाख रुपयांची मदत

प्रतिनिधी : शिरूर : संकटाच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे उदाहरण शिरूर शहरात पाहायला मिळाले. शहरातील लाटेआळी परिसरात असलेल्या अशोक टाक यांच्या ‘गणेश टॉईज’ या होलसेल दुकानाला दिवाळीच्या दिवशी भीषण आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या दुर्घटनेत अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, ऐन सणासुदीच्या काळात टाक कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

RelatedPosts

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

अशोक टाक यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हातगाडीवरून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी छोट्या व्यवसायाचे रूपांतर ‘गणेश टॉईज’ या नावारूपाला आलेल्या होलसेल दुकानात केले. अनेक वर्षांच्या कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय दिवाळीच्या दिवशी आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यासमोर पुन्हा नव्याने व्यवसाय उभारण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

या कठीण प्रसंगी अशोक टाक यांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू करावा, यासाठी शिरूरकरांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या परिवाराच्या वतीने एक लाख रुपये, उपनगराध्यक्ष नितीनदादा पाचर्णे यांच्या वतीने ५० हजार रुपये, तर महायुतीच्या नगरसेवक, नगरसेविका व सभापती यांच्या वतीने दीड लाख रुपये अशी एकूण तीन लाख रुपयांची आर्थिक मदत अशोक टाक यांना देण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे, बांधकाम सार्वजनिक समितीचे सभापती सुनीलदादा जाधव, स्वच्छता सभापती एजाजभाई बागवान, नगरसेवक अभिजितकाका पाचर्णे, निलेशदादा गाडेकर, सागर नरवडे, निलेशदादा पवार, महिला व बालकल्याण सभापती आयेशाताई सय्यद, नगरसेविका स्वीटीताई शिंदे, रिंकूताई जगताप, सुनीताताई कुरुंदळे, संगीताताई मल्लाव, सुनिताताई भुजबळ, स्वातीताई साठे, नगरसेवक उमेश शेळके, संतोष थेऊरकर यांच्यासह महायुतीचे नगरसेवक, नगरसेविका व सभापती उपस्थित होते.

उपस्थितांनी आगीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून अशोक टाक यांना धीर दिला. या मदतकार्याचा पुढाकार आणि समन्वय हलवाई गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष अविनाश जाधव यांनी घेतला.

केवळ आर्थिक मदत देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभा राहिलेला व्यवसाय पुन्हा उभा राहावा आणि अशोक टाक यांना नव्याने सुरुवात करण्याचे बळ मिळावे, या भावनेतून मदतीचा हात पुढे करण्यात आला.

संकट कितीही मोठे असले, तरी समाजाची एकजूट आणि माणुसकीची साथ मिळाली तर पुन्हा नव्याने उभे राहण्याचे बळ मिळते. शिरूरकरांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीतून हाच संदेश दिला आहे. आगीत नुकसान झालेल्या अशोक टाक यांचा व्यवसाय पुन्हा सुरू होण्यासाठी समाजातील नागरिकांनीही शक्य ते सहकार्य करावे, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

शिरूर नगरपरिषदेच्या कारभारावरील आरोपांना अभिजीत पाचर्णे यांचे प्रत्युत्तर

Next Post

माणिकडोह बोगदा निर्माण कृती समिती गठीत; अध्यक्षपदी घनश्याम शेलार यांची सर्वानुमते निवड

Related Posts

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक
Blog

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक

November 14, 2026
8
सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
Blog

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

November 14, 2026
2
लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे
Blog

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

November 14, 2026
12
कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट
Blog

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

November 13, 2026
7
पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे
Blog

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

November 13, 2026
7
भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे
Blog

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल पेटविणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे

November 13, 2026
8
Next Post
माणिकडोह बोगदा निर्माण कृती समिती गठीत; अध्यक्षपदी घनश्याम शेलार यांची सर्वानुमते निवड

माणिकडोह बोगदा निर्माण कृती समिती गठीत; अध्यक्षपदी घनश्याम शेलार यांची सर्वानुमते निवड

ताज्या बातम्या

माणिकडोह बोगदा निर्माण कृती समिती गठीत; अध्यक्षपदी घनश्याम शेलार यांची सर्वानुमते निवड

माणिकडोह बोगदा निर्माण कृती समिती गठीत; अध्यक्षपदी घनश्याम शेलार यांची सर्वानुमते निवड

November 14, 2026
सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

November 14, 2026
शिरूर नगरपरिषदेच्या कारभारावरील आरोपांना अभिजीत पाचर्णे यांचे प्रत्युत्तर

शिरूर नगरपरिषदेच्या कारभारावरील आरोपांना अभिजीत पाचर्णे यांचे प्रत्युत्तर

November 14, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In