

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले_बालसंगोपन योजनेचा लाभ मिळाला…
नायगाव तालुका प्रतिनिधी..
घुंगराळा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ मिळावा याकरिता घुंगराळा येथे दिं.29 जुलै रोजीमहिला व बालविकास विभागामार्फत अर्ज घेऊन निराधार असणाऱ्या बालक, व त्यांच्या माता यांच्यामार्फत प्रस्ताव तयार करुन घेण्याचे शिबिर आयोजित केले होते.
यानंतर तालुक्यातील घुंगराळा, वंजारवाडी,सावरखेड, रानसुगाव, होटाळा येथील येथील अर्जदारांना या योजनेबद्दल मार्गदर्शन करून अर्ज भरण्यास सहकार्य केले. व या प्राप्त झालेल्या अर्जांची महिला व बालविकास विभागामार्फत चौकशी करून पात्र लाभार्थी निवडले, याकरिता वसंत सुगावे पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री मा.ना.आदीतीताई तटकरे यांच्याकडे व शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या योजनेचा लाभ अनेकांना मिळवून दिला…
या योजनेत बालकांची आई,किंवा वडील यापैकी एकाचा मृत्यू किंवा दुर्धर आजार असे असणाऱ्या अत्यल्प उत्पन्न गटात असणाऱ्या बालकांना वयाच्या 18 वर्षांपर्यंत शासनाकडून दरमहा 2250 रुपये मिळणार आहेत.
सदर योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचवून सदर योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल सर्व लाभार्थ्यांनी वसंत सुगावे पाटील यांचे आभार मानले.
या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल वसंत सुगावे पाटील यांनी महिला बालविकास अधिकारी सौ. रंगारी मॅडम,व महिला बालकल्याण समितीचे सर्व सदस्य यांचे आभार मानले.
तसेच पात्र झालेल्या सर्व लाभार्थ्यांची वसंत सुगावे पाटील यांनी घुंगराळा येथे बैठक घेऊन पुढील काळात मिळणाऱ्या अनुदानाबाबत माहिती दिली…..
Discussion about this post