नायगाव तालुका प्रतिनिधी…
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण नांदेड व तालुका विधि सेवा समिती नायगाव यांच्यावतीनें दिनांक २८.०९.२०२४ रोजी नायगाव बा. येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकन्यायालयात प्रलंबित असलेल्या एकूण खटल्यांपैकी १७ दिवाणी स्वरुपाची व ४७ फौजदारी प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्यात आली असुन त्यातून एकूण ९४०० रूपये वसुल करण्यात आली.तसेच दाखलपुर्व एकुण २९४६ प्रकरणांत नोटीसा देवुन उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात आले होते. त्यापैकी ३८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
त्यामध्ये ४३,०७,१२९ रूपयांची प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्यात आली.लोकन्यायालय यशस्वी करणेकामी अध्यक्ष विधी सेवा समिती नायगाव बा. श्रीमती ए.टी. गित्ते, व सह दिवाणी न्यायाधीश श्री. आर.एम. लोळगे यांनी भरपुर प्रयत्न केले. तालुका विधीज्ञ संघाचे अध्यक्ष श्री. एन. आर. देशपांडे व इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
तसेच न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तालुक्यातील बँका व पंचायत समितीच्या कर्मचा-यांनी सहकार्य केले…..
Discussion about this post