

छत्रपती संभाजीनगर शहरातील पिसादेवी परिसरात दि.18/02/2022 रोजी मातंग समाजांतील जनार्दन कसारे यांची जातीय द्वेषातून हत्या करण्यांत आली होती. म्हणून अत्याचारास बळी पडलेल्या मृत्यू प्रकरणातील पिडीत कुटुंबियांच्या वारसांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक
अधिनियम 1989 कायद्याअंतर्गत कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेणे अनिवार्य असतांना मयत जनार्दन कसारे यांचा मुलगा नामे साईनाथ जनार्दन कसारे हे गेल्या 02 वर्षांपासून शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र छत्रपती संभाजीनगर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पी.जी.वाबळे हे अर्जदार मुलगा हा मयत व्यक्तींवर अवलंबून नसल्याचा आपल्या मर्जीतील दाखला देत जाणूनबुजून अर्जदार यांना
टाळाटाळ करीत आहेत व शासकीय नोकरीपासून वंचित ठेवत आहेत म्हणून त्यांच्या निषेधार्थ साईनाथ कसारे हे दि.01 ऑक्टोबर 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा 6 वा दिवस आहे. या अनुषंगाने क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.उत्तमरावजी कांबळे, मातंग एकता
आंदोलनाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संदिप मानकर यांनी पालकमंत्री मा.ना.अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन उपोषणार्थी साईनाथ कसारे यांची शासकीय अधिकाऱ्याकडून होत असलेली टाळाटाळ मंत्री सत्तार यांच्या लक्षांत आणून दिली असून मी लवकरच याची दखल घेतो आणि सहाय्यक आयुक्त यांना बोलतो असा विश्वास दिला…. याप्रसंगी ऍड. संतोष भुयागळे, गजानन मानकर, सोमिनाथ कसारे, भरत मानकर आदींची उपस्थिती होती..!!
Discussion about this post