• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 22, 2026
in Blog
0
कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे येथील धनगर समाज सेवा संघाचे पदाधिकारी आणि मुंबईतील समाजबांधवांचा संयुक्त सहभाग; ३ जानेवारी २०२७ रोजी पुण्यात राज्यस्तरीय मेळावा

प्रतिनिधी : भारत कवितके : कांदिवली पश्चिम येथे धनगर समाज सेवा संघ आणि धनगर समाजबांधवांची वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता इराणीवाडी रोड क्रमांक ३ येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यालयात ही संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे येथील धनगर समाज सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कांदिवली परिसरातील समाजबांधव सहभागी झाले होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

बैठकीच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंच्या समाजबांधवांनी एकमेकांशी परिचय करून दिला. धनगर समाजातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी धनगर समाज सेवा संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. तसेच हिंगोली येथील धनगर समाजाचे नेते रामरावजी वडतिके यांच्या निधनाबद्दल बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर यांनी प्रास्ताविकात संघाच्या कार्याची माहिती दिली. सध्या संघाचे कार्य २५ जिल्ह्यांमध्ये सुरू असून समाजबांधवांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. संघाच्या वतीने सुबक व आकर्षक रंगीत नोंदणी पुस्तिका तयार केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुणे येथील राहटणी येथे ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या १९ व्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याला सर्व समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुकुंदराव कुचेकर यांनी केले. यावेळी संघाच्या विस्ताराचा आणि कार्याचा आढावाही घेण्यात आला.

या बैठकीस मुकुंदराव कुचेकर, भारत कवितके, शिवाजी पिसे, केशव कुचेकर, मल्हारी लाळगे, किरण कुचेकर, दिलीप कुचेकर, बाळासाहेब पिसे, अभिमन्यू गाडेकर, रमेश सावळकर, भीमराव सातपुते, गजानन कवितके, तुकाराम देवडे, धानापुणे, सतीश पिसे यांच्यासह धनगर समाजबांधव उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

Next Post

कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

Related Posts

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण
Blog

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026
0
औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
Blog

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

November 21, 2026
18
मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी
Blog

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

November 21, 2026
7
दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
Blog

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026
12
शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
Blog

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026
11
भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती
Blog

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

November 19, 2026
10
Next Post
कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026
सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

November 22, 2026
कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

November 22, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In