• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 21, 2026
in Blog
0
मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मिलिंद नगरमधील नवीन रस्त्यासाठी अतिक्रमण हटविण्यास सुरुवात; गोरगरीब नागरिकांवर अन्याय होऊ नये, स्थानिकांची भूमिका

मेहकर | प्रतिनिधी : मेहकर शहरातील मिलिंद नगरकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या कामासाठी नगरपालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ते डीपी रोड, मेहकरपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे ७.५ मीटर रुंदीकरण करून नवीन रस्ता तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे. या कारवाईमुळे परिसरातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RelatedPosts

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

शहराचा विकास, रस्त्यांचे रुंदीकरण आणि नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, विकासकामे करताना सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचाही विचार होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमण हटविताना संबंधित नागरिकांना विश्वासात घेण्यात आले आहे का? त्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई कशी दिली जाणार? असे प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

नगरपालिकेने अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना कोणत्याही गोरगरीब कुटुंबावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या नागरिकांच्या मालमत्तेचे किंवा बांधकामाचे नुकसान होणार आहे, त्यांना नियमानुसार योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली गोरगरीबांच्या संसारावर घाला घालणे योग्य ठरणार नाही. नगरपालिकेने कारवाईत पारदर्शकता ठेवून नुकसानग्रस्त नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा मिलिंद नगर परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

या कारवाईवेळी नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. त्यामध्ये विशाल शिरपूरकर, जावेद गवळी, अख्तर भाई, अनिल मुळे यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी होते.

आता नगरपालिकेचे प्रशासन नागरिकांच्या मागणीची कितपत दखल घेते आणि संभाव्य नुकसानग्रस्तांना कशा प्रकारे न्याय देते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

Related Posts

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
Blog

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026
9
शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
Blog

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026
9
भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती
Blog

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

November 19, 2026
8
गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

November 19, 2026
101
पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान
Blog

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

November 19, 2026
14
शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान
Blog

शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान

November 19, 2026
31

ताज्या बातम्या

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

November 21, 2026
चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In