येवला : शालेय पोषण आहार योजनेत काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस महिला कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत समावेश करावा, अशी मागणी वर्तमान एकात्मता फाऊंडेशन संचलित कष्टकरी कामगार एकता संघाचे संस्थापक अध्यक्ष शरद लोहकरे यांनी येवला दौऱ्यावर आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.शासनाने आशा, अंगणवाडी, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख रुपये व अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तशीच मदत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना देखील मिळावी, अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांकडून शाळेतील इतर काम करुन घेतले जाते. तर शाळा व गाव राजकारणात विनाकारण त्रास देऊन कामावरून काढले जाते. याबाबत प्रशासनाला समज देण्यात यावी अशी विनंतीही निवेदनाच्या शेवटी लोहकरे यांनी केली आहे. निवेदनप्रसंगी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्ष शारदा लोहकरे, डॉ. हरिश्चंद्र राऊत, शंकर पुणे,संदीप वाघ, संजय वैद्य, मच्छिंद्र पवार, शरद भदाणे, बाळासाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते.
Discussion about this post