✍️प्राथमिक शाळा पिपरी ✍️
आज दिनांक 08/10/2024 ला प्राथमिक शाळा पिपरी येथील शाळेला लावण्यात आले कुलूप.
सतत निवेदन देऊन देऊन कंटाळलेल्या शाळा वेवस्थपन समिती व विद्यार्थांच्या पालकांनी व ग्रामंचायत सर्व पदाधिकाऱ्याने शाळेला लावले कुलूप. सतत 2022, 2023 व 2024 ला पंचायत समिती व जिल्हा परीषद शिक्षण विभागाला सतत निविदन दिले तरी शासनाने शिक्षक उपलब्ध न करून दिल्याबद्दल गावातील सर्व पदाधिकाऱ्याने व नागरिकाने घेतला मोठा निर्णय,

सर्व विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या दरवाजाला कुलूप लावले व दारा समोरच भरवली शाळा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला होता. शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा
तो ह्या विद्यार्थ्यांनी आज शाळेच्या बाहेर वर्ग भरवून देशाचे भवितव्य असलेल्या.या मुलांनी स्वताच्या शिक्षणासाठी उन्हात बसून आम्हाला शिक्षक पाहिजे नाहीतर आम्ही शाळेत प्रवेश घेणार नाही असे मुलांनी सांगितले.
आम्हाला शिक्षक पाहिजे मनून शासनाकडे केली चिमुकल्यांनी व पालकांनी विनंती.
Discussion about this post