उमरी तालुका प्रतिनिधी*
मौजे जिरोना तालुका उमरी येथे दिनांक ४/१०/२०२४ रोजी सकाळी १० वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली. ग्रामसभा अध्यक्षपदी गावातील प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र बाळोजी पुपूलवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये खालील ठराव पारित करण्यात आले, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षस्थानी सर्वानुमते डी .जी तुपसाखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
व तसेच ग्राम सुरक्षादल अध्यक्षपदी साईनाथ शंकर येगलेवाड यांची निवड करण्यात आली या ग्रामसभेमध्ये गावाच्या सर्वागीन विकासासाठी दारूबंदी, कुऱ्हाड बंदी , ग्राम सुरक्षा ,दल आदी ठराव सर्वानुमते पास करण्यात आले, या ग्रामसभेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. नारायणराव संभाजीराव जिरोनेकर ( मा. सभापती) संजय पेंदे (ग्रामसेवक) दत्तात्रय नारायण आलकेवार ( मा सरपच) सौ सुशीला मारोती दर्शनवाड ( सरपंच) सौ ललिता . एस येगलेवाड (उपसरपंच )जी .बी सुदेवाड (से नि .शि) दत्तात्रय येगलेवाड( माजी उपसरपंच ) दत्ता करडे संभाजी शिंदे पाटील.
संभाजी इसानकर (मा पो पा ) गणपत वाघमारे पोलीस पाटील, दिनाजी काळे ( रोजगार सेवक) शंकर कोल्हेवाड , शंकर येगलेवाड ,विक्राम बारशेवाड, विठ्ठल बारशेवाड, शिवाजी गुंडेवाड( ग्रा पं सदस्य) संजय सुद्धेवाड( माजी सरपंच) गणेश येगलेवाड, मारोती दर्शनवाड, पोशट्टी बारशेवाड, गणेश कोंडलेवाड, योगेश चुनुपवाड, बळीराम बारशेवाड , व्यंकटी पिल्लेवार ,मुंजाजी बरकुमे, हनमंत वाघमारे (या ग्रा.प. स) गंगाधर आकुलवाड, कैलास पुपुलवाड , ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आहे.
Discussion about this post