
विहिरगांव प्रतिनिधी
राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या विहिरगांव येथील जिल्हा परिषद शाळा विहिरगांव येथे वन्यजीव सप्ताह निमित्य वृक्षारोपण चित्रकला आणी निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
वृक्षारोपण स्वप्नील वाढई शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक सावरखेडा शाखा यांच्या हस्ते करण्यात आले व विद्यार्थ्यांना वन्यजीव व वनाबद्दल माहिती सांगण्यात आली आणी चित्रकला व निबंध स्पर्धा सुद्धा घेण्यात आली.
यावेळी वनविभागाचे कर्मचारी आरती भसारकर वनरक्षक महादेव एम सिडाम वनरक्षक बँक कर्मचारी संजय बुटे वनमजूर विजय आत्राम गजानन चावरे शिक्षक विजय खंगारे प्राजक्ता जगताप व अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक उपस्तित होते.
Discussion about this post