…..
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयातून सहा खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले, आणि धनगर समाजाचा एसटी आरक्षण अमंलबजावणी साठी मार्ग मोकळा झाला.आता एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता मंत्रालयातून थेट जीआर (परिपत्रक) काढण्यास काही ही अडचण राहिलेली नाही.सकल धनगर जमातीच्या वतीने पुणे येथे अधिवेशन, जेजुरी ते पंढरपूर जागर यात्रा,९ सप्टेंबर २०२४ पासून पंढरपूर येथे आपले सहा उपोषण करणारे मल्हार यौध्दे,
१६ दिवसाचे उपोषण संपून छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालया बाहेर गणेश केसकर व योगेश धरम यांनी उपोषण करुन खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले.या दरम्यान महाराष्ट्र विविध ठिकाणी उपोषण, लाक्षणिक उपोषण, रास्ता रोको, निवेदने देणे,टायर जाळून रास्ता रोको, शेळ्या मेंढ्या बरोबर घेऊन आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलन धनगर समाज बांधवांनी व भगिनी केली.या सर्वांच्या परिश्रमाने छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयातून सहा खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले.
यामुळे धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी ची ५० टक्के लढाई जिंकला असून मंत्रालयातून आता धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता थेट जीआर काढावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाज बांधव आता लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.व आपल्या वर ७० वर्ष झालेला अन्याय दूर करणार, डॉ.सुधाकर शिंदे समितीचा अहवाल ही मंत्रालयात सादर करण्यात आला आहे.या सर्व पाश्र्वभूमीवर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी चा जीआर काढतील अशी प्रत्येक धनगर समाज बांधवांच्या मनात आशा आहे.आचारसंहिता लागण्यापूर्वीच आरक्षण अमंलबजावणी होईल, हे मात्र नक्की.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम मोबाईल 8652305700
Discussion about this post