ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा उद्योगसमुहाचे चेअरमन रतन टाटा (८६) यांनी जगाचा निरोप घेतल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारं आहे.

आपल्या उद्योगाचा विस्तार करताना त्यांनी नैतिकतेची चौकट कधीही ओलांडली नाही आणि प्रत्येक वेळी देशाचा नावलौकीक वाढवण्याचंच काम केलं. सामान्य माणसाच्या मनातही त्यांनी आपलं आगळं-वेगळं असं स्थान निर्माण केलं आणि सामान्य माणसाचं सर्वाधिक प्रेमही त्यांना मिळालं. त्यांच्या निधनाने उद्योग विश्वातील एका पर्वाचा अस्त झाला. देश त्यांना कायम स्मरणात ठेवील.
भावपूर्ण श्रद्धांजली!
Discussion about this post