संजय फलके, शिरूर तालुका प्रतिनिधी
शिरूर येथील आर.एम.धारिवाल पूर्व प्राथमिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माता पालकांचे आगमन होताच सर्व शिक्षकांनी त्यांच्या हातावर आलता लावून पालकांचे व त्यांच्या पाल्यांचे स्वागत केले. शिक्षकांनी बनविलेल्या सेल्फी पॉईंट कडे सर्व पालकांची गर्दी झाली आकर्षक अशा सेल्फी पॉईंट बरोबर सेल्फी घेऊन पालक व विद्यार्थी आनंदी झाले. नवरात्री उत्सवातील गाण्यांची सुरुवात होताच माता पालकांनी गाण्यावर ठेका धरल्याची माहिती मुख्याध्यापिका आश्विनी घारू यांनी दिली. सर्व माता पालक, बालक व शिक्षक मिळून गरबा आणि दांडिया खेळून नवरात्र उत्सव आनंदाने पार पाडला खेळून दमलेल्या माता पालकांनी गरम चहाचा आस्वाद घेतला. या गरबाच्या आयोजनाने मातापालक आनंदी होऊन शाळेच्या मुख्याध्यापिका आश्विनी घारू व शिक्षकांचे पर्यायाने शाळेचे भरभरून कौतुक केले. महिला वर्गांसाठी असेच कार्यक्रमांचे आयोजन पुढेही करत रहावे अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केल्याचे पाहून मुख्याध्यापिका घारू यांनी पूर्व प्राथमिक वर्गाच्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले व नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली. शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, संस्थेचे सदस्य धरमचंद फुलफगर यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या… या कार्यक्रमासाठी अनेक पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
Discussion about this post