मलकापुर भालेगाव रस्त्यावर मलकापूर नजिक अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्परने एसटी महामंडळाच्या बसला धडक दिल्याने बस चालक बोरकर गंभीर जखमी झाले असून बसमधील काही प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत.

मलकापुर व नांदुरा तालुक्याला गौण खनिजांची देणगी लाभलेली असुन तालुक्यातील पुर्णा नदीत रेतीचे फार मोठमोठे घाट आहेत तसेच दोन्ही तालुक्यात शासकीय पडित जमीनी आहेत.मलकापुर तालुक्यातील ऊमाळी,घिरणी,बेलाड,वडोदा,तालसवाडा,शिवनी,भानगुरा येथील शासकीय जमीनीतुन जोमात अवैध उत्खनन होत आहे.शासनाने अवैध उत्खनन रोखण्याची जबाबदारी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे सोपवली आहे.परंतु तालुक्यात शासकीय जमिनीतुन करोडो रुपयांच्या गौण खनिजांची चोरी होत असतांना संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी झोपेचे सोंग घेऊन आहेत.अनेक मंडळ अधिकारी टिप्पर, जेसीबी पकडुन वरच्यावर चिरीमिरी घेऊन सोडुन देतात.सामाजिक कार्यकर्त्यांनी गौण खनिज चोरीच्या तक्रारी केल्यास वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यात चालढकल करतात.कल्याण टोल कंपनीने तालुक्यात खनिज चोरीचा उच्चांक गाठला आहे.परंतु महसुल विभागाकडून स्वतः होऊन कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरूनच जी काय ती थातुरमातुर कारवाई करण्यात आली .बेलाड येथील प्रकरण गेली दोन वर्षे झाली थंड बस्त्यात आहे.तर धुपेश्वर रस्त्याच्या कामात हजारो ब्रास मुरुम विनापरवानगी वापरण्यात आला आहे.तलाठी, मंडळ अधिकारी यांनी साधा अहवालही तहसिलदार यांचेकडे दाखल केला नाही.तर शासकीय निवासस्थानाच्या कामात विनापरवानगी गौण खनिज वापरले गेले आहे.तक्रार करूनही कारवाई मात्र शुन्य आहे.अशाप्रकारे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी हप्ते घेऊन मुग गिळून गप्प बसले आहेत व त्यामुळे टिप्पर चालक व मालकांची हिम्मत वाढली असून तालुक्यात गौण खनिजांची वाहतूक करणारी वाहने बेभानपणे धावत आहेत.आजपर्यंत या वाहनांमुळे शेकडो निरपराध नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे तर शेकडो नागरिक कायमचे अपंग झाले आहेत.आता कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी जातीने लक्ष घालून तालुक्यातील शासकीय जमिनींवरील अवैध उत्खननाचे ऑडिट करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
Discussion about this post