⛔ श्री दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आदर्श नागरिकांचा सन्मान…
अकलूज येथील नवीन बाजार तळ येथे दर वर्षी नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो तेथील श्री दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने अनेक नवनवे उपक्रम दरवर्षी राबविले जातात…
यंदाच्या वर्षी हि अकलूज येथील कु शिवानी महालिंग राऊत हि तरुणी ग्रामविकास अधिकारी होऊन माण तालुक्यातील म्हसवड येथे पोस्टिंग झाल्याने तसेच अंगणवाडी च्या आदर्श सेविका घाडगे मॅडम आणि अकलूज येथीलच सुरज शिवाजी थोरात हा युवक पोलिस भरती झाल्याने त्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला…
श्री दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने वरील सर्व मान्यवरांचा सन्मान टाइम्स 9 न्यूज चे संपादक नौशाद मुलाणी आणि अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्या हस्ते करण्यात आला…
या वेळी राजेंद्र शिवाजी माने,मंडळाचे कार्यकर्ते,पदाधिकारी,लहान मुलं,मुली महिला बंधू-भगिनी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते,अशी माहिती श्री दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाचे विश्वस्त सोमनाथ पवार साहेब यांनी दिली…

Discussion about this post