नायगाव विधानसभा मतदारसंघातील मौजे रामखडक येथील काशी तिर्थयात्रा देवदर्शनाहून परतलेल्या भाविकांच्या वतीने आज मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी #मावंदे व #महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते व निमंत्रणास मान देऊन आमदार राजेश पवार यांच्या पत्नी सौ.पूनमताई राजेश पवार यांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.
काशी तिर्थयात्रेहून परतलेल्या रामखडक गावातील ८०ते ९० भाविकांना दर्शनाचा योग आला. ग्रामस्थांनी पूनमताईचा भव्य, उत्साहपूर्ण आणि प्रेमपूर्वक स्वागत केले. गावोगावी दिलेल्या भेटी आणि साधलेला संवाद हा आमचा पवार परिवार आणि जनतेतील ऋणानुबंध दृढ करणारा असाच आहे.
यावेळी उपस्थित सरपंच परमेश्वर लक्ष्मण गोरठकर उपसरपंच देविदास पा जाधव तुकाराम बाबुराव शिंदे रमेश पांडुरंग शिंदे आदी उपस्थित
Discussion about this post