पारनेरच्या ग्रामीण वाहतुकीला येणार वेग : ग्रामीण विकासाच्या कक्षा रुंदावणार
पारनेर/ प्रतिनिधी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – ३ अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ठ निश्चित करताना राज्यसरकार मार्फत व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील ३० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचा समावेश केला असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे विद्यमान सदस्य श्री.विश्वनाथ दादा कोरडे यांनी दिली आहे.
सबंधित रस्त्यांमध्ये तालुक्यातील बाभुळवाडे ते रांधे रस्ता ४ कि.मी, निघोज ते बोदगेवाडी रस्ता ४ कि.मी, करंदी ते सुरडवाहिनी रस्ता १.८५ कि.मी, पळसपुर ते ढगेवाडी रस्ता २ कि.मी, रायतळे ते भैरवनाथ वस्ती रस्ता १.१९ कि.मी, पाडळी तर्फे कान्हूर ते शिंदे वस्ती जामगाव रस्ता ५ कि.मी, काकणेवाडी ते पिंपळगाव तुर्क रस्ता ४ कि.मी, पिंपरी पठार ते पाडळी दर्या रस्ता ४ कि.मी, पुणेवाडी ते गणेशखिंड रस्ता २ कि.मी आणि वडझिरे ते शेरी कोलदरा रस्ता २ कि.मी. या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Discussion about this post