
एस. के. दिगे. मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने. राज्यस्तरीय समाजभान भूषण पुरस्कार, खा. छ. शाहू महाराज यांच्या हस्ते आयु. प्रतापराव तराळ यांना राज्यस्तरीय समाजभान भूषण पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार देण्याचे कारण गेले अनेक वर्ष 15 ते 16 वर्षापासून आज अखेर गेले वयाच्या साठीपर्यंत 45 वर्ष सामाजिक चळवळ असो/आंबेडकरी चळवळ असो/कामगार चळवळ असो/आशा विविध क्षेत्रांमध्ये भाग घेऊन तन मन धन काम केलेले आहे व करीत आहे.१) उदा. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. हातकणंगले तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे व धम्माचा प्रचार व प्रसार केलेला आहे व करीत आहे २) कामगार चळवळ-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मधील कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्रणित महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन जिल्हा सचिव ते राज्य सहसचिव म्हणून काम केलेलं आहे व सध्या करीत आहे कर्मचारी यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून त्यांना न्याय देण्याचे काम गेले 28 वर्ष अखंडपणे काम प्रामाणिकपणे केलेले आहे व करीत आहे ३) जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती तालुका अध्यक्ष पासून ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर कार्य असून या समितीमध्ये 2009 पासून ते आज अखेर पर्यंत समितीमध्ये काम करत आहे उदाहरण शेतकरी/शेत मजूर/कष्टकरी/कर्मचारी/व झोपडपट्टी धारक. यांच्या असे अनेक विषयावर अन्याय होत असेल तर आणि विषयावर भ्रष्टाचार प्रकरण असेल तर व्यक्तिगत असो व सार्वजनिक असो असे अनेक प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे व करत आहे म्हणून असे सामाजिक कामाची दखल घेऊन मला एस . के. दिगे. मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने खा. छ. शाहू महाराज यांच्या हस्ते मला राज्यस्तरीय समाज भान भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे तरी मी एस. के. दिगे. मेमोरेल फाउंडेशन चा आभार मानतो व अभिनंदन करतो, असे प्रकारे मनोगत व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.
Discussion about this post