महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी च्या मोहोळ तालुका अध्यक्ष पदी हाजी मुश्ताक बागवान…
मोहोळ येथील सामाजिक चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते हाजी मुश्ताक रहिमबक्ष बागवान यांची महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी च्या मोहोळ तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र संस्थापक अध्यक्ष डॉ शरीफ बागवान यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले…
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे मोहोळ तालुका अध्यक्ष आणि मोहोळ येथील मर्कस मस्जिद चे खजिनदार म्हणून कार्यरत असणारे हाजी मुश्ताक बागवान यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला असल्या कारणाने मोहोळ च्या मुस्लिम समाज चळवळीत आनंदाचे वातावरण पसरले आहे…
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी पार पाडणारे हाजी मुश्ताक बागवान यांची महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटी च्या मोहोळ तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे भ्रमण ध्वनी वरून बोलताना सारथी महाराष्ट्राचा चे प्रतिनिधि आमीर मोहोळकर यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचाल साठी शुभेच्छा दिल्या…

Discussion about this post