राळेगांव तालुका प्रतिनिधी- अरविंद कोडापे
राळेगांव कोल्हे सभागृहामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राळेगाव विधानसभा ही काँग्रेस पक्षाला मिळाली असल्याचे काँग्रेस पक्षाकडून जो कोणी काँग्रेस पक्षश्रेष्ठी उमदेवार देईल आपण सर्व त्या उमेदवाराचे काम करुन निवडुन यायचे आहे .पक्षांतर्गत गावागावामध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी असली तरी ती यावेळी सगळे मतभेद विसरून आपल्याला काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या पतधिक्याने निवडुन आणायचे आहे
.यावर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी मंचावर वसंतराव पुरके माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रफुल्लभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस ओबिसी सेल, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदीप ठुने अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, अशोकराव केवटे,मिलिंद इंगोले सभापती खरेदी विक्री संघ राळेगाव, अंकूश रोहनकर संचालक, अंकूश मुनेश्वर संचालक, बाबासाहेब जवादे, प्रविण कोकाटे, उत्तमराव फुटाणे,दिनकराव देशमुख, भारत पाल , महादेवराव मेश्राम, अँड .सिमाताई तेलंगे,सदाशिव मडावी, आशिष कोल्हे, वसंतराव शेटे, राजेश शर्मा,धवल घुगरुड अध्यक्ष राळेगाव तालुका युवक काँग्रेस, तसेच राळेगाव तालुक्यातील सर्व काँग्रेसचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post