
महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिराती छापणाऱ्या राज्यातील शेकडो बिल्डरांना महारेराने नोटीस बजावली आहे.यापैकी अनेक बिल्डरांना महारेराने दंड ठोठावला असुन काही बिल्डरांकडून दंड वसूलसुद्धा करण्यात आला आहे.यात मुंबई,पुणे व नागपूर विभागातील बिल्डर्सचा समावेश आहे.
सुरवातीला फक्त मुंबई मुख्यालयात याबाबत सुनावण्या घेण्यात येत होत्या.आता मुंबईशिवाय पुणे आणि नागपूर कार्यालयातही सुनावण्या घेण्यात येत आहेत . मुंबई विभागात मुंबई शहर, उपनगरे, कोकण, ठाण्याचा समावेश आहे.पुणे विभागात कोल्हापूर, सोलापूर, नाशिक अहमदनगरचा समावेश आहे तर नागपुर विभागात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
बिल्डरांनी काय केले ?
काही बिल्डरांकडे महारेरा नोंदणी क्रमांक असुनही त्यांनी तो जाहिरातीत छापला नाही.किंवा वाचताही येणार नाही एवढ्या बारीक अक्षरात छापलेला होता.फेसबुक, ऑनलाइन, डिजिटल बोर्ड आणि तत्समद्वारे अनेक जाहिरातीत महारेरा क्रमांक छापला जात नाही.
महारेरा नोंदणी आवश्यक !
५०० स्क्वेअर मिटरपेक्षा जास्त किंवा आठ सदनिकांचा कोणताही प्रकल्प असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.नोंदणीक्रमांक असल्याशिवाय बिल्डरांना प्रकल्पांची कुठल्याही प्रकारची जाहिरात करता येत नाही.ग्राहकांनी फक्त महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करावी, असे आवाहन महारेराने केले आहे.
Discussion about this post