प्रतिनिधी :- नरेश मोरे (7039498699)
“श्री गणेश कृपा सामाजिक सेवा संस्था” (पुर्य तर्फ सावर्डे गावकर वाडी)
ही संस्था समाजामध्ये सध्या कार्यरत समाज पातळीवर सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कला क्रीडा या क्षेत्रात काम करत आहे. शालेय विद्यार्थी आपल्या देशाचे पुढील भविष्य आहेत ह्या अनुसंगणे विध्यार्थी शिकून अधिक प्रगतीशील होऊन यशाचे मोठे शिखर पार करतील या उद्देशाने विध्यार्थी गुणगौरव सोहळा, तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम संस्थेच्या मार्फत राबविण्यात येतात. तसेच समाज हिताची कामे करण्यासाठी ही संस्था नेहमी कार्यरत असते.
आता नुकतेच कर्क रोगाचा सामना करत असणारे राजापूर तालुक्यातील श्री प्रकाश चव्हाण यांना त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी खर्च मोठ्या प्रमाणात आहे असे सांगितले असल्याकारणाने “श्री गणेश कृपा सामाजिक सेवा” संस्थेने त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे ठरविले. त्या वेळी संस्थेचे पदाधिकारी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारुपूस करून त्यांना आर्थिक स्वरूपात मदत केली.
या वेळी श्री प्रकाश चव्हाण यांच्या घरच्या नातेवाईकांनी संस्थेचे आभार मानले आणि अशीच आपली संस्था खूप मोठी होवो आणि आपल्या हातून समाजाला आधार मिळावा असे आशीर्वाद त्यांच्याकडून मिळाले.त्या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुढे वर्षानुवर्ष आमच्या हातून अशीच सेवा घडतं राहील असे आश्वासन दिले. या संस्थेच संर्वानकडुन अभिनंदनासह कौतुक होत आहे.
Discussion about this post