समता शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक, माजी समाज कल्याण सभापती विलास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त तेरवाड येथे अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कै.गोविंदा बंडू आवळे सोशल फाउंडेशन, समता बॉयज व युवक मंडळे व विविध संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी विविध संस्था, मंडळे, व पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुरवातीला कै गोविंदा बंडू आवळे सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.उमेश आवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व फाउंडेशनच्या वतीने शाल व श्रीफळ देवून अभिष्टचिंतन केले.
या वेळी युवक नेते अमोल खोत, कृषी अधिकारी मा.रमेश माळगे, उमेश आवळे, युवराज पाटील मनोज राजमाने, यांची गौरवपर भाषणे झाली व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या वेळी महेश साळुंखे, सोहेल पटेल, सुरज कांबळे, सचिन गायकवाड, विशाल कांबळे, प्रेम खांडेकर, रमेश वडार, उमेश शेडबाले, उदय कांबळे, अमोल मधाळे, जावेद मुल्ला, सादिक जमादार, अविनाश कांबळे, महेश खोत, विकी पोवार, आरकेश माने, चेतन पाटील, स्वप्नील पाटील, संग्राम जगताप, आदर्श बंडगर, राजू कट्टी, शिवप्रतीक बरगाले, ऋषिकेश कमलाकर, श्रेयश राजमाने, जयदीप मोरे, अविनाश कोरवी, संजय निर्मळे, उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुक्तेश्वर वसाहत वडार समाज संघटना अध्यक्ष दत्ता वडर, उपाध्यक्ष किरण धोत्रे ,सचिव अमित वडर, कार्याध्यक्ष रमेश वडर व संघटक अविनाश पवार त्याचबरोबर मातंग समाज संघटना गंगापूर चे कार्याध्यक्ष उमेश शेडबाळे, नितीन खामकर, समता बॉईज चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी सत्कारमूर्ती विलास कांबळे यांनी आपले मनोगतातून सर्व तरुण सर्व मान्यवरांचे आभार मानले.
Discussion about this post