गडस्वच्छता मोहिम मोठ्या उत्साहात संपन्न..
जय शिवराय! जय शंभुराजे !!जय जिजाऊ !!!
आई जगदंबेच्या कृपेने आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राजा शिवछत्रपती परिवार संस्था – मुंबई परिवार यांची मोहीम क्रमांक 100 “शतक महोत्सवी मोहीम सोहळा” किल्ले सांकशी” मुंगोशी-पेण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी मुंबई परिवाराचे तसेच नाशिक परिवाराचे मावळे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते.
एकच ध्यास, गडकोट विकास !
तुमचं आमचं नातं काय! जय जिजाऊ जय शिवराय !! अशा घोषणा देत. पहाटे 5.30 ते 7 किल्ले सांकशी पायथा ते मुंगोशी गाव मशाल ज्योत दौड काढण्यात आली. सकाळी 7 वाजता मुंगोशी गावतील जय हनुमान वाघ्रेश्र्वर मंदिरातील सभामंडपात छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, गारद घेवून अल्पोपहार करून मुंबई गोवा महामार्गावरील तरणखोप, तसेच आंबिवली फाटा आंबिवली गाव, दवणशेर गाव, बेळवडे गाव फाटा, मुंगोशी गाव,किल्ले सांकशी पायथा असे एकूण 12 किल्ले सांकशी दिशा दर्शक फलक लावण्यात आले.
जेणेकरून किल्यावर येणाऱ्या दुर्ग सेवकांना मावळ्यांना किल्ले सांकशी पर्यंत सहज पोहचता येईल. तदनंतर 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत किल्ले सांकशी
गड स्वच्छता मोहीम संपन्न झाली. गडावर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात त्याच्या उजव्या बाजूस सूचना फलक लावण्यात आला गडउतार होऊन पुन्हा माघारी मुंगोशी गावात रुचकर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.
ही मोहीम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी मुंगोशी गावातील तरुण युवक मंडळ, महिला वर्ग, सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले. सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
मुंबई परिवाराचे मावळे निलेश चव्हाण, यतिश करण, राकेश पालवे, सचिन फापाले, आकाश कुवेस्कर, ज्ञानेश्वर इंगोले, दिलीप शिंदे, अर्चनाताई चौधरी यांनी खूप मेहनत घेतली आणि ही मोहीम यशस्वी झाली. त्याचबरोबर मुंबई परिवाराचे मावळे आणि रणरागिणी बाळ मावळे यांचेही मोठे सहकार्य लाभले.
आपल्या प्रास्तविक भाषणात राजा शिवछत्रपती परिवार संस्था मुंबई परिवाराचे मावळे, सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी गडसंवर्धन करणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य खूप गरजेचं आहे कारण आम्ही कधीतरी पाहुणे येणार आहोत हा गड तुमचा आहे आणि त्याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. शिवकन्या कु.ओवी कैलास घरत ही देखील पोवड्यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होती.
राजा शिवछत्रपती परिवार संस्था मुंबई परिवारातर्फे यावेळी विश्वनाथ बेकावडे पोलिस पाटील मुंगोशी, नारायण गोळे माजी उपसरपंच, सुदाम जाधव (आचारी ),रुचिता साळवी,शिल्पा विनोद गोळे, यशवंत गोळे, हरेश पाटील सरपंच, मनोज गोळे, विनोद गोळे यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. रायगड भूषण शिवशाहीर कु.अथर्व आणि आर्या संतोष पाटील यांच्या पहाडी आवाजात पोवाड्यांचा कार्यक्रम झाला.
ढोलकीवादक देवेंद्र ठाकूर, ऑर्गनवादक भूषण चव्हाण, कोरस- सुजित खैरे, प्रसाद पाटील, पारस पाटील, चैतन्य लोखंडे यांची उत्तम साथ लाभली. शिवगर्जनांनी सर्व वातावरण अगदी शिवमय होवून गेले होते. ऋत्विक कुलकर्णी यांचे शिवव्याख्यान झाले. पालखी सोहळा, शिवकालीन मर्दानी खेळ, हलगी वादन, किल्ले सांकशी गडावर भगवा ध्वजारोहण, भंडारा उधळण अशा प्रकारे ही शतक महोत्सवी मोहीम अतिशय संस्मरणीय ठरली.
आपले दुर्ग ! कैलासराजे घरत
खारपाडा पेण
“राजा शिवछत्रपती परिवार संस्था “मुंबई परिवार” आयोजित
“शतक महोत्सवी मोहीम सोहळा” किल्ले सांकशी”मुंगोशी-पेण
गडस्वच्छता मोहिम मोठ्या उत्साहात संपन्न..
जय शिवराय! जय शंभुराजे !!जय जिजाऊ !!!
आई जगदंबेच्या कृपेने आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राजा शिवछत्रपती परिवार संस्था – मुंबई परिवार यांची मोहीम क्रमांक 100 “शतक महोत्सवी मोहीम सोहळा” किल्ले सांकशी” मुंगोशी-पेण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी मुंबई परिवाराचे तसेच नाशिक परिवाराचे मावळे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते.
एकच ध्यास, गडकोट विकास !
तुमचं आमचं नातं काय! जय जिजाऊ जय शिवराय !! अशा घोषणा देत. पहाटे 5.30 ते 7 किल्ले सांकशी पायथा ते मुंगोशी गाव मशाल ज्योत दौड काढण्यात आली. सकाळी 7 वाजता मुंगोशी गावतील जय हनुमान वाघ्रेश्र्वर मंदिरातील सभामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, गारद घेवून अल्पोपहार करून मुंबई गोवा महामार्गावरील तरणखोप, तसेच आंबिवली फाटा आंबिवली गाव, दवणशेर गाव, बेळवडे गाव फाटा, मुंगोशी गाव,किल्ले सांकशी पायथा असे एकूण 12
किल्ले सांकशी दिशा दर्शक फलक लावण्यात आले जेणेकरून किल्यावर येणाऱ्या दुर्ग सेवकांना मावळ्यांना किल्ले सांकशी पर्यंत सहज पोहचता येईल. तदनंतर 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत किल्ले सांकशी
गड स्वच्छता मोहीम संपन्न झाली. गडावर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात त्याच्या उजव्या बाजूस सूचना फलक लावण्यात आला गडउतार होऊन पुन्हा माघारी मुंगोशी गावात रुचकर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.
ही मोहीम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी मुंगोशी गावातील तरुण युवक मंडळ, महिला वर्ग, सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले. सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
मुंबई परिवाराचे मावळे निलेश चव्हाण, यतिश करण, राकेश पालवे, सचिन फापाले, आकाश कुवेस्कर, ज्ञानेश्वर इंगोले, दिलीप शिंदे, अर्चनाताई चौधरी यांनी खूप मेहनत घेतली आणि ही मोहीम यशस्वी झाली. त्याचबरोबर मुंबई परिवाराचे मावळे आणि रणरागिणी बाळ मावळे यांचेही मोठे सहकार्य लाभले.
आपल्या प्रास्तविक भाषणात राजा शिवछत्रपती परिवार संस्था मुंबई परिवाराचे मावळे, सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी गडसंवर्धन करणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य खूप गरजेचं आहे कारण आम्ही कधीतरी पाहुणे येणार आहोत हा गड तुमचा आहे आणि त्याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. शिवकन्या कु.ओवी कैलास घरत ही देखील पोवड्यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होती.
राजा शिवछत्रपती परिवार संस्था मुंबई परिवारातर्फे यावेळी विश्वनाथ बेकावडे पोलिस पाटील मुंगोशी, नारायण गोळे माजी उपसरपंच, सुदाम जाधव (आचारी ),रुचिता साळवी,शिल्पा विनोद गोळे, यशवंत गोळे, हरेश पाटील सरपंच, मनोज गोळे, विनोद गोळे यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. रायगड भूषण शिवशाहीर कु.अथर्व आणि आर्या संतोष पाटील यांच्या पहाडी आवाजात पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. ढोलकीवादक देवेंद्र ठाकूर, ऑर्गनवादक भूषण चव्हाण,
कोरस- सुजित खैरे, प्रसाद पाटील, पारस पाटील, चैतन्य लोखंडे यांची उत्तम साथ लाभली. शिवगर्जनांनी सर्व वातावरण अगदी शिवमय होवून गेले होते. ऋत्विक कुलकर्णी यांचे शिवव्याख्यान झाले. पालखी सोहळा, शिवकालीन मर्दानी खेळ, हलगी वादन, किल्ले सांकशी गडावर भगवा ध्वजारोहण, भंडारा उधळण अशा प्रकारे ही शतक महोत्सवी मोहीम अतिशय संस्मरणीय ठरली. आपले दुर्ग! आपला स्वाभिमान..!!
Discussion about this post