
प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा,
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून कृतीतून शिक्षण देणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार नगर आयोजित तालुकास्तरीय लंगडी स्पर्धा १९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेमध्ये वाटेफळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुलाचा संघ विजेता ठरला असून त्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. संघाचा कर्णधार सोहम संजय खरात यांनी उत्कृष्ट खेळी खेळून विजय खेचून आणला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेफळ यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल खेळाडूंचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयसिंग भांडवलकर, उपाध्यक्ष अजित नुसते, व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोसले मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती हुसेनी मॅडम,सहशिक्षक श्री सदानंद चिंचोडीकर सर, प्रशिक्षणार्थी मिरा नुसते मॅडम, शिक्षणप्रेमी नागरिक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
Discussion about this post